बर्थडे स्पेशल : वाचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ठाऊक नसलेल्या गोष्टी…

0

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानचा आज ५२ वा वाढदिवस आहे. १४ मार्च १९६५ ला मुंबईमध्ये दिग्दर्शक-निर्माते हुसैन आणि झीनम हुसैन यांच्या घरी अमीरचा जनम झाला. आमिर खानने बॉलीवूडमध्ये ३३ वर्षे काम केले आहे. आमिर आज जरी मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जात असला तरी त्याच्या जीवनातील काही गोष्टी क्वचितच आपल्याला माहित आहेत… वाचा आमिर खानच्या आयुष्यातील ठाऊक नसलेल्या गोष्टी…

* आमिर खानने वयाच्या ८ व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. १९७३ साली ‘यादों की बारात’ चित्रपटातील एका गाण्यातून त्याने पाहुण्या बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

* रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यापूर्वी आमिर ‘अवांतर’ नावाच्या एका नाटक समूहाचाही भाग होता. त्याने पडद्यामागील अनेक कामे केली. तोच अनुभव त्याला बॉलीवूडसाठी कामी आला. ‘केसर बिना’ या गुजराती नाटकातही त्याने अभिनय केला आहे.

* आमिर खानचे संपूर्ण नाव ‘मोहम्मद आमिर हुसैन खान’ आहे. परंतु आता तो आमिर खान नावानेच प्रसिद्ध आहे.

* आमिर खानने वयाच्या २१ व्या वर्षी गर्लफ्रेंड रिना दत्तासोबत पळून जाऊन लग्न थाटले होते. त्यांनी जेव्हा लग्न केले तेव्हा आमिरचा ‘कयामत से कयामत तक’ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होता.

*  आमिर खानने पहिली पत्नी रिना हिच्याशी १७ वर्षाचे नाते तोडून किरण रावसोबत लग्न केले. किरण राव आणि आमिरची ओळख ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

* १९९३मध्ये आलेल्या यश चोप्राच्या ‘डर’ चित्रपटात शाहरुख खानने रोहन मेहराची निगेटिव भूमिका केली होती. सर्वप्रथम ही भूमिका आमिर खानला ऑफर झाली होती. मात्र त्याने काही कारणास्तव या चित्रपटाला नकार दिला होता.

* अभिनयासोबतच आमिर खान एक उत्तम खेळाडू आहे. तो महाराष्ट्र राज्याचा टेनिस चॅम्पियन होता. त्यामुळे त्याला टेनिस खेळ आवडतो. रोजर फेडरर त्याचा आवडता खेळाडू आहे.

* आमिरला मित्रांपेक्षा मैत्रिणी जास्त होत्या. कारण त्याला घराजवळ असलेल्या मुलींच्या शाळेत घातले होते. या शाळेत पाचवी पर्यंत मुलांना शिक्षण घेण्यास परवानगी होती.

* आमिर दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तो एखादा चित्रपट साइन करण्यापुर्वी त्याची कथा बारकाईने वाचून समजून घेतो. त्याला वाटले, कि हा चित्रपट आपल्यासाठी परफेक्ट आहे, तरच तो त्या चित्रपटासाठी होकार देतो.

* आमिरने इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावे अशी त्याच्या कुटुंबियांची इच्छा होती. मात्र आमिरने अभिनयाची वाट निवडली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.