बर्थडे गर्ल आलिया भट्टचे ग्लॅमरस फोटो, वाचा तिच्याविषयी बरेच काही…

0

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा आज 25 वा वाढदिवस आहे. १५ मार्च १९९३ ला मुंबईत आलियाचा जन्म झाला. महेश भट आणि सोनी राजदान यांची मुलगी आलियाने २०१२ मध्ये आलेल्या ‘स्टूडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिने ३ महिन्यात १६ किलो वजन कमी केले होते. त्यावेळी तिचे वजन सुमारे ६७ किलो होते.

निर्माता करण जोहरच्या ‘स्टुडेंट ऑफ द इअर’ चित्रपटासाठी जवळपास ४०० तरुणींचे ऑडिशन घेतले होते. यात आलियानेसुध्दा ऑडिशन दिले होते. ऑडिशन दिल्यानंतर करण जोहरने तिची शनाया सिंघानियाच्या भूमिकेसाठी निवड केली होती.

१९९९ मध्ये आलेल्या ‘संघर्ष’ चित्रपटात आलियाने प्रिती झिंटाच्या बालपणीची भूमिका साकारली होती. त्यावेळी ती केवळ ६ वर्षांची होती. आलियाने प्राथमिक शिक्षण मुंबईतील जमुनाबाई नर्सरी स्कूलमधून घेतले.

आलिया अभ्यासात फार हुशार नव्हती मात्र इतर अक्टिव्हिटीजमध्ये ती नेहमीच पुढे असायची. त्यामुळेच ती एक उत्तम डान्सर आणि हँडबॉल खेळाडूसुध्दा आहे.

आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे अफेअर सुरु असल्याची जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये नेहमीच असते. मागील काही दिवसांपूर्वी दोघांनी एका मॅग्झिनसाठी हॉट फोटोशूट केले होते. ‘स्टूडंट ऑफ द इयर’पासून आलिया आणि सिद्धार्थची जवळीक वाढल्याचे बोलले जाते.

आलियाने आतापर्यंत ‘हायवे’, ‘2 स्टेट्स’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ सारखे हिट चित्रपट दिले आहेत.

आलियाचे निकनेम ‘आलू’ आहे, तिला घरात प्रेमाने ‘आलू’ नावाने हाक मारतात. आलियाला शाहीन ही एक सख्खी बहिण असून पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन सावत्र बहिण भाऊ आहेत.

आलियाचे पहिले सिलेब्रिटी क्रश आहे तर दुसरे सिलेब्रिटी क्रश शाहिद कपूर आहे. आलियाला हवाई प्रवासाची भीती वाटते. विमान प्रवासावेळी ती नेहमी नर्व्हस होते. आलियाला कँडललाइट डिनर मुळीच आवडत नाही.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.