बघा ‘दंगल’ गर्लचा हा घायाळ करणारा व्हिडीओ

0

‘दंगल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. ‘दंगल’मधून सान्याने लोकप्रियता मिळविली. ‘दंगल’मध्ये बबिता फोगटची भूमिका साकारली होती. सध्या सान्या सोशल मीडियावर चर्चेत असून तिच्या एका डान्स व्हिडीओने सर्वत्र धूम घातली आहे.

सान्या ‘दंगल’नंतर अद्याप एकाही चित्रपटात दिसली नाही. मात्र तरीही ती नेहमी चर्चेत असते. कारण सान्या एक अभिनेत्रीच नव्हे तर उत्कृष कोरिओग्राफर सुद्धा आहे. काही दिवसांपूर्वीच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये ती फातिमा सना शेखसोबत एका इंग्रजी गाण्यावर ठुमके लावताना दिसत होती. आता पुन्हा एकदा तिने असाच काही व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सान्या एका गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिच्या या अदा चाहत्याना घायाळ करणाऱ्या आहेत.

आतापर्यंत या व्हिडीओला १.१ लाख लोकांनी बघितले आहे. शिवाय तिचे कौतुकही केले जात आहे. वास्तविक सान्या एक ट्रेंड बॅले डान्सर आहे.

सान्या लवकरच एका नवीन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘फोटोग्राफर’ असे आहे. हा चित्रपट रितेश बत्रा दिग्दर्शित करीत असून काही दिवसांपूर्वीच तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तसेच ती लवकरच आयुष्यमान खुराणाच्या अपोझिट आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. या चिपटाचे नाव ‘बधाई हो’ असे आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.