‘फुकरे रिटर्न्स’ टीम अॅट गोल्डन टेम्पल
पंजाब – शुक्रवारी रिलिज होत असलेल्या ‘फुकरे रिटर्न्स’ या हिंदी चित्रपटातील कलाकारांनी गुरुवारी अमृतसर (पंजाब) येथील प्रसिध्द आणि शिख धर्मीयांचे श्रध्दा स्थान असलेले गोल्डन टेम्पल येथे शिख धर्म गुरूंचे दर्शन घेतले.
अभिनेत्री ऋचा चढ्ढा, अभिनेता पुलकीत शर्मा, मंजोत सिंग, फजल अली यांच्या बरोबर चित्रपटाचा दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा ही टीम सोबत होता. ही सर्व कलाकार अभीनेता वरुण शर्माचे गाव असलेल्या जालंधर येथेही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलती.
फुकरे रिटर्न्स ही फुंकरे या हींदी चित्रपटाचा पुढील भाग आहे. 2013 मध्ये अलेला फुकरे हा सिनेमा सुपर हीट राहीलेला होता. त्यातील ‘चुचा’ हे पात्र ही खुप लोकप्रिय झाले होते.
अभिनेत्री ऋचा चढ्ढा, अभिनेता पुलकीत शर्मा, मंजोत सिंग, फजल अली या कलाकारांना या सिनेमाकडून फार अपेेक्षा आहे, आता पर्यंत फिल्मच प्रमोशनही चागल झाल आहे.
शुक्रवारी म्हणजे 8 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलिज होणार आहे.