प्रीमिअर बॅडमिंटन लीग : २३ डिसेंबरला सुरु होणार टूर्नामेंट, 2 नवीन टीम होणार सामील

0

२३ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या प्रीमिअर बॅडमिंटन लीग (पिबीएल) च्या तिसऱ्या सत्रात ८० खेळाडूंसह एकूण २३ सामने खेळले जाणार आहेत. १४ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या सत्रात दोन नवीन टीमसह ८ टीम सहभाग घेणार आहेत. अहमदाबाद स्मॅश मास्टर्स आणि नॉर्थ इस्टर्न वॉरिअर्स या दोन नवीन टीम यावेळी सामील होणार आहेत. आयोजकांनी बुधवारी सांगितले कि, या टूर्नामेंटमध्ये एकूण २३ सामने होणार आहेत. लीगमध्ये भाग घेणाऱ्या टीममध्ये चेन्नई स्मॅशर्स, अवध वॉरिअर्स, नॉर्थ इस्टर्न वॉरिअर्स, हैद्राबाद हंटर्स, दिल्ली डॅशर्स, मुंबई रॉकेट्स, अहमदाबाद स्मॅश मास्टर्स आणि बंगळूरू ब्लास्टर्स या टीम सामील होतील.

आठ विश्वपदक विजेते, तसेच ऑलम्पिक पदक विजेते या टूर्नामेंटमध्ये सहभाग घेणार आहेत. सहा कोटींचे बक्षिस असलेल्या या टूर्नामेंटचे उद्घाटन स्पर्धा २३ डिसेंबरला पीवी सिंधूच्या चेन्नई स्मॅशर्सचा सामना सायना नेहवालच्या अवध वॉरीअर्ससोबत होणार आहे. लीगचा सेमीफायनल तसेच फायनल हैद्राबादमध्ये होणार आहे. टूर्नामेंटचा सेमीफायनल १२ आणि १३ जानेवारीला होणार आहे. तसेच फायनल १४ जानेवारीला होणार आहे. टूर्नामेंटचा पहिला टप्पा गुवाहाटीमध्ये होणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.