प्रियांका चोप्राचे हे स्वप्न राहिले अपूर्ण, व्यक्त केले दु:ख

0

अभिनेत्री प्रियांका चोप्राने अगदी कमी वेळेत भारताला ग्लोबल वर्ल्डमध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. अनेक यश पदरी पडूनदेखील एक स्वप्न अपूर्ण राहिले, असे तिचे म्हणणे आहे. अलीकडेच प्रियांका एका कार्यक्रमात गेली होती. तिथे प्रियकाने सांगितले, कि वडिलांच्या शेवटच्या दिवसांत मी त्यांच्या सोबत राहू शकले नाही. हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे दु:ख आहे.

मी भीतीला मागे टाकून जिंकत गेले, हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. प्रियांका पुढे म्हणाली, कि पूर्वी मी खूप भावूक होते आणि अनेक गोष्टी मला प्रभावित करत होत्या. पणतू आता मी त्यावरसुद्धा ताबा मिळवला आहे.

प्रियांका सांगते, कि तिला सावधान करणार तिच्या आयुष्यात कुणीच नव्हत. मी माझ्या अनुभवातून सर्व शिकत राहिले. त्यातूनच अनेकदा अपयश हाती आले. पण वडिलांसोबत शेवटचे क्षण घालवू शकले नाही, याचच दु:ख नेहमी राहील. मी बरेलीमधील एक साधी सरळ मुलगी होते, तिथून इथपर्यंत येण्यात सर्व तुमचे सहकार्य आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.