प्रतीक बब्बरने ‘या’ तरुणीसोबत केला साखरपुडा…!

0

बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरचा साखरपुडा झाल्याचे नुकतीच माहिती मिळाली आहे. 31 वर्षांच्या प्रतीकने लखनौमध्ये अगदी खासगी सोहळ्यात गर्लफ्रेण्ड सान्या सागरसोबत साखरपुडा केला.

प्रतीक हा प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. प्रतीक आणि त्याची गर्लफ्रेण्ड 22 जानेवारीला लखनौमध्ये बंधनात अडकणार असल्याची चर्चा मागील काही आठवड्यांपासून होती. प्रतीक आणि सान्या गेल्या 8 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मात्र गेल्यावर्षी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. गोव्यातील एका म्युझिक फेस्टीव्हलदरम्यान प्रतीकने सान्याला प्रपोझ केले होते.

या साखरपुड्याच्या सोहळ्याला दोघांचे कुटुंबीय, काही नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता. प्रतीकने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन ही चाहत्यांना खुशखबर दिली आहे. सान्या ही बेस्ट पार्टनर असल्याच्या भावना प्रतिकने व्यक्त केल्या आहेत. लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मंदिरात साध्या पद्धतीने लग्न करण्याची त्याची इच्छा आहे.

प्रतीक बब्बरने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो एक दिवाना था, धोबीघाट यासारख्या चित्रपटांमध्ये झळकला. ‘बागी 2’ चित्रपटातून तीन वर्षांनी तो पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अहमद खान यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

तसेच सान्याने फॅशन कम्युनिकेशन या विषयात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून पदवी घेतली. सध्या सान्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.