पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रेंची डोक्यात बॅट घालून हत्या

0

पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. डोक्यात बॅट घालून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बिद्रे यांच्या डोक्यात बॅट घालून त्यांना ठार केले अशी कबुली या प्रकरणातला आरोपी महेश फळणीकर याने दिली. महेश फळणीकर हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरचा खास मित्र आहे. त्याने या हत्याकांडात अभय कुरुंदकरांची साथ दिली असून पोलिस चौकशीत ही कबुली दिली.

अश्विनी बिद्रे यांचे हत्याप्रकरण पोलिस अधिकारी दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे. अश्विनी ब्रिदे यांची हत्या केल्यानंतर ४ आरोपींनी काही पुरावे नष्ट केले, हे मागील दिवसांपूर्वी समोर आले होते. बिद्रे यांची हत्या करुन त्यांचे धड आणि हात-पाय, डोके वेगळे करण्यात आले. अभय कुरुंदकरने तुकडे केलेल्या हात, पाय आणि डोके यांची विल्हेवाट लावली. मात्र धड टाकण्यासाठी त्याने चौथा आरोपी महेश पळणीकर याची मदत घेतली होती. लोखंडी पेटीत धड भरुन दोघांनी वसईच्या खाडीत टाकल्याची माहिती पळणीकरने दिली होती.

काय आहे प्रकरण ?

१५ एप्रिल २०१६ पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलिस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबाने केला. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर अश्विनी यांची पहिली पोस्टिंग पुण्याला तर नंतरची पोस्टिंग सांगलीला झाली. याच दरम्यान अश्विनी यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकरशी झाली. या दोघांत जवळीक वाढली. त्यानंतर २०१३ मध्ये अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाले आणि त्या रत्नागिरीत रुजू झाल्या. अभय कुरुंदकर हे रत्नागिरीत अश्विनीला भेटण्यासाठी यायचे. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना कळाले. कुरुंदकर आणि अश्विनी यांच्यात नेहमी वाद व्हायचे. कुरुंदकर यांनी अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही त्यांच्या पतीला दिल्या होत्या. त्यामुळे अश्विनी यांचे कुटुंब नेहमी तणावात असायचे.

याच दरम्यान म्हणजे २०१५ ला अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोलीच्या पोलिस ठाण्यात झाली. परंतु त्या येथे हजर झाल्याच नाहीत. त्या हजर का झाल्या नाही? याबाबतचे पत्र पोलिस खात्याने अश्विनी यांना पाठवले होते. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना ‘त्या’ गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी कळंबोली पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.