पैलवान निलेश कंदूरकरचा उपचारादरम्यान मृत्यू

0

पैलवान निलेश कंदूरकरची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. सहा दिवसांनंतर पैलवान निलेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कुस्ती खेळताना कुस्तीच्या आराखड्यातच निलेशला गंभार दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला मुंबईला हलवण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. मात्र रस्त्यातच त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले होते.

तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज (6 एप्रिल) पहाटे 4 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ज्येतिबा यात्रेनिमित्त कोल्हापूरातील बांदिवडे गावात 1 एप्रिल रोजी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी कुस्ती सुरु झाली आणि प्रतिस्पर्धी पैलवानाने निलेशला उचलून जमिनीवर आपटले. या डावात निलेशच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर तो उठलाच नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.