पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा… अन्यथा आंदोलन छेडू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

0

मागील काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. याचा सर्व सामान्यांना मोठा फटका बसत आहे. याच्या निषधार्थ औरंगाबाद येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने क्रांती येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे कि, या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य माणूस होरपळून निघत आहे. वास्तविक पाहता, अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पडलेल्या असताना सरकारने भरमसाठ कर लावून पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ केली आहे. भाजप सरकारने नोटबंदी, जी.एस.टी आणि जनतेला छळणारे जे निर्णय घेतले त्यामुळे सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. या जुलमी निर्णयाचा औरंगाबाद शहरजिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करत सायकल रॅली काढली. पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले नाही तर शहरजिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेख कय्युम अहेमद यांनी दिला.

यावेळी शहरजिल्हा अध्यक्ष दत्ता भांगे, विलास मगरे, रहीम पटेल, अशरफ पटेल, रहीम पटेल, अब्दुल खादर, अन्वर नवाब आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.