पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर भडकले
गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होत आहे. सोमवारी (१६ जानेवारी) दरांनी उच्चांक गाठला आहे. सोमवारी दिल्लीत नोंदवण्यात आलेल्या दरांनुसार डिझेलचा दर प्रतिलीटर ६१.७४ रुपयांवर पोहोचला, तर पेट्रोलने ७१ रूपयांचा टप्पा ओलांडला आहे.
तेल कंपन्यांच्या दर तक्त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर ऑगस्ट २०१४ नंतर प्रथमच इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. दिल्लीच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेल मुंबईत महाग मिळते. त्यामुळे सध्या मुंबईत प्रती लीटर डिझेलची किंमत ६५.७४ रूपये इतकी आहे. गेल्या महिन्याभरात डिझेलच्या प्रती लीटर दरात ३.४० रुपयांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलची किंमत २.०९ रूपयांनी वाढली आहे.
या शहरांत पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर –मुंबईमध्ये पेट्रोल 79.15 रु. तर डिझेल 65.90 रु. इतके आहे. पुण्यात पेट्रोल 78.89 रु. तर डिझेल 64.66 रु., नाशिकमध्ये पेट्रोल 79.48 रु. व डिझेल 65.25 रु., औरंगाबादेत पेट्रोल 80.08 रु. तर डिझेल 66.84 रु., रत्नागिरी येथे पेट्रोल 79.74 रु. व डिझेल 65.64 रु दर झाले आहे.