पाहा राणी मुखर्जीचे ग्लॅमरस फोटो, वाचा तिच्याविषयीच्या काही गोष्टी

0

बॉलिवूड अभिनेञी राणी मुखर्जीने आज वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. राणीचा जन्म 21 मार्च 1978 ला मुंबईमध्ये झाला. तिने तिच्या अभिनय करिअरची सुरुवात 1997 साली आलेल्या दिग्दर्शक अशोक गायकवाड यांच्या ‘राजा की आएगी बरात’ या चिञपटातून केली होती. माञ हा राणीचा पहिला चिञपट नसून एक बंगाली चिञपट होता. त्या चिञपटाचे नाव ‘बियेर फूल’ असे होते.

दिग्दर्शक राम मुखर्जी आणि पाश्र्वगायक कृष्णा मुखर्जी यांच्या घराण्यात राणीचा जन्म झाला. तिचा मोठा भाऊ राजा मुखर्जी हा एक निर्माता-दिग्दर्शक आहे.

राणी अभिनेत्री काजोल, दिग्दर्शक अयान मुखर्जीची चुलत बहिण आहे.

राणी उडिसी नृत्याही शिकली आहेत. तिला नृत्याची आवड आहे.

‘युवा’ चित्रपटाचे शूटिंग चालू असताना राणी आणि अभिषेक बच्चनचे प्रेमसंबंध असल्याची जोरदार चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरू होती.

आमिर खानसोबतचा तिचा ‘गुलाम’ चित्रपट त्यावेळी ब्लॉकब्लस्टर झाला होता.

त्याचवर्षी राणीने करण जोहरचा ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपटही हीट ठरला होता.

राणीने विवेक ऑबेरॉयसोबत ‘साथिया’ चित्रपटात काम केले. या चित्रपटाने मोठी कामाई केली होती. तसेच, राणीला ‘साथिया’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

‘ब्लॅक’ या चित्रपटात राणीने बहि-या आणि अंध मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला 2 राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले होते.

२०१३ तिने सचिन कुडाळकरच्या ‘अय्या’ चित्रपटात काम केले. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण, राणीची भूमिका नावाजली गेली. त्याचवर्षी राणीने रीमा काग्तीच्या ‘तलाश’ या चित्रपटात आमिर खान आणि करिना कपूरसोबत काम केले. हा चित्रपट तिकीट बारीवर यशस्वी ठरला.

2005 साली जेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ भारत भेटीवर आले होते, तेव्हा मनमोहन सिंह यांनी त्यांच्या सन्मानार्थ दिल्लीतील हॉटेल अशोकमध्ये डिनर ठेवले होते. या डिनरला राणी मुखर्जीला आमंत्रित करण्यात आले होते. हे निमंत्रण मिळवणारी राणी एकमेव बॉलिवूड कलाकार होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.