पालघर-माहिम रोडवर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू 

0

पालघर-माहिम परिसरातील पाटीलवाडी रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. माहीम रस्त्यावर कार झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. बुधवारी (7 फेब्रुवारी) पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

ही कार माहिमहून पालघरला जात होती. अपघातातील 5 मृत व्यक्तींमध्ये एक वडराई येथील रहिवासी आहे तर इतर 4 जण तारापूर परिसरातील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता कि, कार चक्काचूर झाली आहे.

किरण परशुराम पागधरे (वय- 30, रा. वडराई), चालक विराज अर्जुन वेताळ (वय-25, रा.पालघर), संतोष वामन बहिराम (वय- 37, रा. खाणपाडा), निकेश मोहन तामोरे (वय- 29, रा. तारापूर), दिपेश रघुनाथ पागधरे (वय-25, रा. सातपाटी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.