पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0

पालघर जिल्ह्यातील भाजप खासदार चिंतामण वनगा (वय 67) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिल्ली येथे निधन झाले. दिल्लीच्या राममोहन लोहिया रुग्णालयात चिंतामण वनगा यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज सकाळी (३० जानेवारी) चिंतामण वनगा यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले होते. पण आज सकाळी १०:३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली.

भाजपचा आदिवासी चेहरा राहिलेले चिंतामण वनगा तीनवेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले होते. 1996 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 1999 मध्ये ते डहाणू मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच 2014 मध्ये पालघर मतदारसंघात ते खासदार झाले. व्यवसायाने वकील असलेले चिंतामण वनगा यांनी भाजप ठाणे जिल्ह्याचे अध्यक्षपद भूषवले होते.

चिंतामण वनगा यांच्या रुपाने भाजपने पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे नेतृत्त्व गमावले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.