पाणी तापवण्याच्या कारणावरुन सासऱ्याने सुनेसह नातवांवर केला चाकूने हल्ला

0

आंघोळीचे पाणी तापवण्याच्या कारणावरुन सासऱ्याने सुनेसह नातवांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील मल्हारपेठ गावात बुधवारी (१४ फेब्रुवारी) घडली आहे.

घरात अंघोळीचे पाणी तापवण्याच्या कारणावरुन आरोपी पांडुरंग सातपुते आणि त्यांच्या सुनेमध्ये वाद झाला. या वादातून पांडुरंग सातपुते यांनी आपल्या सुनेसह नातवांवर चाकू हल्ला केला. यावेळी आईला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणा-या दोन्ही नातवांवरही पांडुरंग सातपुते यांनी चाकूने वार केला. या हल्ल्यात आरोपीसह ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या चाकू हल्ल्यात शुभांगी रमेश सातपुते, मयुरेश रमेश सातपुते, मनीषा रमेश सातपुते यांच्यासह आरोपी पांडुरंग दशरथ सातपुते हेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कोल्हापुर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

<p>याप्रकरणी कळे पोलीस ठाण्यात सासरे पांडुरंग सातपुते यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आला असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.