अंडर-19 क्रिकेट विश्वचषक : पाकचा दारूण पराभव, भारताची फायनलमध्ये धडक

0

अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात भारताकडून पाकिस्तानचा पराभव करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानला 273 धावांचे आव्हान दिले होते. मात्र 69 धावांमध्ये भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. भारत आता अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.

यात इशान पोरेलने सर्वाधिक विकेट्स घेऊन पाकच्या चार खेळाडूंना हरवण्याचा किताब आपल्या नावे केला. तसेच शिवासिंग आणि रियान पराग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. शुभमन गिलने 94 बॉल्समध्ये शानदार शतक केले. गिलने 94 चेंडूंत सात चौकारांसह नाबाद 102 धावांची खेळी उभारली. या सामन्यात पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालराने 89 धावांची सलामी दिली. भरवंशाचा हार्विक देसाई 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलने उत्तम खेळी खेळून भारतीय डावाला नवीन आकार दिला.

भारताच्या या उत्कृष्ट खेळामुळे क्रिकेट जगात तसेच क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह दिसत आहे. अनेक दिग्गजांनी यावर ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.