परवीनने अमिताभ यांच्यावर लावला होता गंभीर आरोप, अनेकांशी होते प्रेमसंबंध

0

बॉलिवूडची सुप्रसिद्धी दिवंगत अभिनेत्री परवीन बॉबी कधीकाळी बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गतकाळातील निर्माता-दिग्दर्शकापासून कलाकारांपर्यंत सर्वजण परवीनसोबत काम करण्यास इच्छुक होते. परवीनने त्याकाळीसुद्धा यश मिळवण्यासाठी बोल्डनेसचा मार्ग निवडला होता. 70 च्या दशकात सर्वांची आवडती असलेली ही अभिनेत्री आता आपल्यात नाहीये. आज परवीन बॉबीची 69 वी बर्थ अॅनिवर्सरी आहे. 4 एप्रिल 1949 रोजी परवीनचा जन्म जूनागढ, गुजरात येथे झाला होता. परवीन तिच्या आई-वडिलांना एकुलती एक होती. वयाच्या सातव्या वर्षीच तिने आपल्या वडिलांना गमावले होते. आज जाणून घेऊया परवीनच्या परवीन बॉबीच्या आयुष्याविषयी…

* तिने अहमदाबादच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. मॉडेलिंगच्या काळात परवीन शिक्षण घेत असताना प्रसिद्ध निर्माता बीआर इशारा यांनी तिच्यावर नजर पडली. बीआर इशारा यांनी तिला पाहिले तेव्हा ती मिनी स्कर्ट परिधान करून सिगारेट ओढत होती. तिच्या या लूकने ते इतके प्रभावित झाले, की त्यांनी तिला लगेच चित्रपटासाठी साइन केले. 1972 मध्ये परवीनने मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती.

* परवीन बॉबीने 1973 मध्ये ‘चरित्र’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात ती क्रिकेटर सलीम दुरानीसोबत झळकली होती. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. परंतु तिच्या उत्कृष्ट अभिनयाने ती प्रेक्षकांच्या नजरेत आली. त्यानंतर 1974 मध्ये परवीनने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘मजबूर’ चित्रपटात काम केले. या चित्रपटाने तिला यश मिळवून दिले. लगेच 1975 मध्ये तिने ‘दीवार’ चित्रपटात पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. या चित्रपटातील तिच्या बोल्ड लूकची बरीच चर्चा झाली. 1977 मध्ये पुन्हा एकदा परवीनला अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘अमर अकबर अँथोनी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता.

* परवीनने केवळ 15 वर्षेच फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले. मात्र ती या काळात नेहमी वादात राहिली. वाद आणि परवीन असे सूत्रच झाले होते. तिचे अनेकांशी नाव जुळले होते. सर्वप्रथम तिचे नाव डॅनी डोंगजप्पासोबत जोडले गेले. ‘धूए की लकीर’ चित्रपटापासून त्यांची जवळीक वाढत गेली होती. मात्र दोघांचे नाते फर टिकले नाही.

* त्यानंतर तिच्या आयुष्यात कबीर बेदी आला. दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहिले. परंतु दोघांचे काही काळातच ब्रेकअप झाले. या दोन्ही ब्रेकअपमधून बाहेर पडणे परवीनसाठी कठिण झाले होते. याच काळात महेश भट्ट तिला भेटले. दोघांचे तब्बल 3 वर्षे अफेअर होते. याच काळात परवीनची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यामुळे महेश यांनी परवीनपासून दूरावा निर्माण केला. तिच्या आयुष्यात अनेक पुरुष येऊन गेले, मात्र अखेरच्या काळात तिने एकांतात दिवस काढले.

* परवीनने तब्बल 50 चित्रपटांत काम केले. तिने ‘शान’, ‘खुद्दार’, ‘काला पत्थर’, ‘सुहाग’, ‘नमक हलाल’, ‘कालिया’, ‘क्रांती’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

* बातम्यांनुसार, परवीनचे नाव अमिताभ बच्चन यांच्यासोबतसुद्धा जुळले होते. परवीनने अमिताभ यांच्यावर एका गंभार आरोप लावला होता. ती म्हणाली होती, की अमिताभ यांनी तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी परवीनची मानसिक स्थिती ठिक नव्हती.

* चित्रपटांपासून दूर परवीनने अध्यात्माचा मार्ग निवडला. ती अमेरिकेला निघून गेली आणि अचानक फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाली. त्यानंतर ती अनेक वर्षांनी मुंबईला परतली. परवीनने सिजोफ्रेनियाने पिडीत होती.

* 20 जानेवारी 2005 ला परवीन आपल्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळली होती. बातम्यांनुसार, परवीन दिर्घकाळापासून तणावात जगत होती. याच काळात तिला गँगरिनने ग्रासले होते. त्यामुळे तिला किडनी आणि शरीराच्या काही अवयवांनी काम करणे बंद केले होते.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.