पन्हाळ्याहून शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवप्रेमी विद्यार्थ्यांच्या ट्रकला भीषण अपघात

0

पन्हाळ्याहुन शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या सांगली येथील वालचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या टॅम्पोला दहाचाकी कंटेनरने मागच्या बाजूने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ५ विद्यार्थी जागीच ठार झाले आहेत. तर २० विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात आज पहाटे ४:३० वाजता नागाव पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळील आंबेडकर नगर येथे झाला.

शिवजयंतीनिमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी एक ट्रक केला होता. ट्रकमध्ये जवळपास ३० विद्यार्थी होते. यावेळी समोरुन आलेल्या बाईकला चुकवत असताना हा अपघात घडला. अपघात भीषण असल्याने ट्रक पुलावरच उलटला, त्यामुळे ट्रकखाली दबून ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

केतन प्रदीप खोचे (वय 21), सुमित संजय कुलकर्णी (वय 23), अरुण अंबादास बोंडे (वय 22), सुशांत विजय पाटील (वय 22), प्रवीण शांताराम त्रिलोटकर (वय 23) या ५ जणांचा अपघातात मृत्यू झाला. मुश्ताक मुजावर, प्रतिक संकपाळ आणि तन्मय वडगावकर, हे तिघेजण अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.