‘पद्मावत’ सर्वत्र होणार प्रदर्शित, कोर्टाने फेटाळली दोन राज्यांची याचिका

0

‘पद्मावत’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला असून दोन राज्यांना दणका मिळाला आहे. चित्रपटावर बंदी आणण्यासाठी मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकारने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यानुसार हा चित्रपट २५ तारखेलाच रिलीज होणार आहे.

चित्रपट रिलीज झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे या दोन्ही राज्यांनी म्हटले होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. एका घटनात्मक संस्थेने चित्रपटाला परवानगी दिलेली आहे, कोर्टानेही प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. तरी तुम्ही पुन्हा कोर्टाकडे येता, असे म्हणत कोर्टाने मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकारची कान उघडणी केली आहे.

यापूर्वी राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि मध्यप्रदेशने चित्रपटावर बंदी आणली होती. मात्र त्याविरोधात निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने निर्मात्यांना दिलासा देत हा सिनेमा सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेश दिले होते.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतरही चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणत राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकार सुप्रीम कोर्टाची पायरी चढले होते. सुप्रीम कोर्टाने यावेळी दोन्ही राज्यांना खडेबोल सुनावून याचिका फेटाळली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.