‘पद्मावत’विरोधात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांचा सेन्सॉर बोर्ड कार्यालयासमोर निषेध

0

येत्या २५ जानेवारी रोजी अनेक बदल केल्यानंतर ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या चित्रपटाला अनेक अडथळे निर्माण होत आहेत. आता प्रदर्शनापूर्वीच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेन्सॉर बोर्डच्या कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिल्याचा यावेळी निषेध करण्यात आला.

यावेळी निषेध करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. मात्र ‘पद्मावत’ सिनेमाला विरोध कायम असल्याचे करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटात अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच चित्रपटाच्या नावात बदल करून ‘पद्मावत’ असे नाव ठेवण्यात आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.