‘पद्मावत’ला हरियाणात बंदी, या राज्यांनीही केला विरोध
दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ चित्रपटात अनेक बदल करून ‘पद्मावती’ नाव बदलून ‘पद्मावत’ केल्यानंतरही या चित्रपटाच्या प्रदर्शानाला विरोध होतच आहे. 25 जानेवारीला हरियाणामध्ये चित्रपट प्रदर्शित होणार नाही, या वृत्ताला राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी मंगळवारी (१६ जानेवारी) दुजोरा दिला.
राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश नंतर हरियाणामध्ये देखील चित्रपट प्रदर्शनाला विरोध केला जात आहे. उत्तर प्रदेश आणि गोवा येथे ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित केले जाईल कि होईल की नाही याबाबत अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाहीये. रविवारी निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली.
हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगु या तिन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
– चित्रपटाच्या चित्रिकरणापासून राजस्थानमध्ये विरोध होत आला आहे. या राज्यात चित्रपट प्रदर्शीत होईल की नाही, हे वेळ आल्यावर कळेल. आता सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली असून चित्रपटात काही कट लावले असल्याचे म्हटले जाते. नावात बदल केला असला तरीही राजस्थान सरकार चित्रपट प्रदर्शनास तयार नाही.
– राजस्थाननंतर ‘पद्मावत’ला मोठा विरोध गुजरातमधून होत आहे. गुजरात राज्य सरकारनेही चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, की संजय लीला भन्साळींचींची ‘पद्मावत’ चित्रपट गुजरातमध्ये रिलीज होणार नाही.
– मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली आहे, की पद्मावत मध्यप्रदेशात दाखवला जाणार नाही.
– हिमाचल प्रदेशात ‘पद्मावत’ प्रदर्शनावर बंदी आहे. करणी सेनेप्रमाणेच हिमाचलमध्ये सुद्धा काही संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत.