‘पद्मावत’ला विरोध कायम, निर्मात्यांनी घेतली सुप्रीम कोर्टात धाव

0

‘पद्मावत’ चित्रपटाचा वाद संपता संपेना असे दिसत आहे. सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतर सुद्धा चार राज्यांत चित्रपटाला बंदी घालण्यात आली आहे. यात राजस्थानसह हरियाणा, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश राज्यांच्याही समावेश आहे. या विरोधात चित्रपटाचे निर्माते कोर्टाची पायरी चढले आहेत. सुप्रीम कोर्टाने यावर लवकराच सुनावणी केली जाईल असा विश्वास दाखवला आहे.

येत्या 25 जानेवारीला ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच करणी सेनाने याला विरोध केला आहे. ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित केला तर सामूहक आत्महदहन करु. सिनेमा प्रदर्शित झाल्यास तलवारी घेऊन चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी थिएटरमध्ये जाऊ आशी धमकी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

‘पद्मावत’ चित्रपटाला होणारा विरोध पाहून राजस्थान सरकारने सिनेमावरील बंदीची घोषणा केली आहे. मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा या राज्यांतदेखील ‘पद्मावत’वर बंदी आणली आहे. वाढता विरोध लक्षात घेऊन ‘पद्मावती’ चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ केले. तसेच सेन्सॉर बोर्डा आदेशानुसार काही बदलही करण्यात आले आहेत. मात्र चित्रपटाला विरोध कायम आहे. याच विरोधात चित्रपटाचे निर्माते आता सुप्रीम कोर्टात गेले आहेत.

‘पद्मावत’ चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला असून दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शहीद कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.