‘पद्मावत’चे रिलीजचे मार्ग मोकळे, सुप्रीम कोर्टाने दाखवला हिरवा झेंडा
संजय लीला भंसाळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद लवकरच संपुष्टात येणार असल्याचे चित्र दिसत आहे. सुप्रीम कोर्टाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा झेंडा दाखवला आहे. राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. या राज्यांनी चित्रपटाच्या बंदी काढलेल्या अधिसूचनेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
देशभरात 25 जानेवारी रोजी ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्या राज्यांनी ‘पद्मावत’ चित्रपटांवर बंदी घालण्याच्या अधिसूचना काढल्या आहेत. त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली आहे. इतर राज्यांनी या चित्रपटाविरोधात अशा अधिसूचना काढण्यास मनाई केली आहे. राज्यांना चित्रपट प्रदर्शनादरम्यान कायदा व सुव्यवस्था पाळणे बंधनकारक आहे असे निर्देश देण्यात आले आहेत.
‘पद्मावत’च्या प्रदर्शना होणाऱ्या विरोधामुळे निर्मात्यांनी बुधवारी (१७ जानेवारी) सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्यानंतरही अनेक राज्यांनी चित्रपटावर बंदी का घातली, असे याचिकेत म्हटले होते. त्यावर गुरुवारी (१८ जानेवारी) सुनावणी झाली.