पदार्थांत टाका हे तीन मसाले, २ आजारापासून मिळेल सुटका

0

हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा वातावरणात खोकला, सर्दी, घसा खवखवणे, घसा दुखणे, अंगदुखी अशा अनेक तक्रारी जाणवतात. त्यामुळे वातावरण बदलल्यानंतर आपल्या खाण्या-पिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. आज आम्ही तुम्हाला काही मसाल्याविषयी सांगत आहोत. हे मसाले तुमच्या अन्नात जरूर वापरा…

* तेजपत्ता –
तेजपत्ता हिवाळ्यात होणाऱ्या सामान्य आजार जसे सर्दी-खोकला, किंवा संसर्गाच्या आजारापासून वाचवते. तेजपत्तामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे व अंटी-इंफ्लामेंट्रीचे गुण असतात. दोन कप पाण्यात तेजपत्ता टाकून दूध आणि साखर टाकून उकळून घ्या. नंतर हे मिश्रण गाळून दिवसातून तीनवेळा प्या. यामुळे सर्दीला आराम मिळेल.

* जायफळ –
जायफळ गरम मसाला आहे. भाजीमध्ये याचा नेहमी वापर केला जातो. यामध्ये रोगप्रतीबंधाचे गुण आहेत. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. एक कप गरम दुधात अर्धा चमचा जायफळची पावडर, मध आणि थोडी इलायची पावडर टाकून प्या. यामुळे हिवाळ्यात होणारे लहान-मोठे आजार बरे होतात.

* काळी मिरी –
तिखट आणि उग्र वास येणाऱ्या काळी मिरीमध्ये असलेले विविध अंटी-ऑक्सीडेंट शरीरातील पचनशक्ती वाढवते. काळी मिरी पावडर एक ग्लास कोमट दुधात टाकून प्यायल्यास हिवाळ्यात शरीर थंड होत नाही आणि कफ सारखे आजार बरे होतात.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.