पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांना वाहिली मानवंदना 

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१९ फेब्रुवारी) शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या ट्विटरवरून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना वाहिली. नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून महाराजांच्या जयंतीनिमित्त एक संदेशही दिला. शिवाजी महाराजांसारखे शूर आणि महान व्यक्तीमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच सर्वांसाठी प्रेरणास्रोत राहिले आहेत, असे शिवाजी पुन्हा होणे नाही असेही मोदी या व्हिडीओमध्ये म्हणाले आहे.

या व्हिडीओच्या माध्यमातून मोदी यांनी जनतेला एक आवाहनही केले आहे. त्यासाठी मोदींच्या यापूर्वीच्या भाषणांचा संदर्भ वापरला आहे. दररोज प्रत्येक भारतीय नागरिकाने किमान एका व्यक्तीची सेवा करावी, तरच या सेवेच्या माध्यमातून आपण महाराजांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करु शकतो.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.