नेत्यानाहू यांनी लावला ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्त्रायल’चा नारा

0

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू गुरुवारी (१८ जानेवारी) मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी ते बॉलीवूडच्या ‘शलोम’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. तसेच बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनसह अनेक कलाकार उपस्थित होते. कलाकारांना नेत्यानाहू यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. यावेळी नेत्यानाहू यांनी भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नमस्ते अशा भारतीय पारंपारिकतेनुसार केली. तसेच भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्त्रायल असा नारा लावला.

या कार्यक्रमात अभिनेत्री ऐश्वर्या राय, अभिनेता अभिषेक बच्चन, दिग्दर्शक सुभाष घई, निर्माता करण जोहर, अनुराग कश्यप, इम्तीयाज़ अली, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष व गीतकार प्रसून जोशी आणि गायक शंकर महादेवन यांसह अनेकजण मान्यवर सहभागी झाले होते.

यावेळी ऐश्वर्या, यूटीव्ही सीईओ रोनी स्क्रूवाला आणि करण जोहर यांनी नेत्यान्याहू आणि त्यांच्या पत्नीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.