नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलांना सीडीआर प्रकरणी अटक 

0

अवैध कॉल डिटेल्स रेकॉर्ड प्रकरणी (सीडीआर) ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे वकील रिझवान सिद्दीकी यांना मुंबईतून अटक केली आहे. पत्नीचे कॉल डिटेल्स आणि पत्नीवर नजर ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेराच्या माध्यमातून नवाजुद्दीनने सीडीआर मागवल्याचा आरोप आहे. याआधीच ठाणे गुन्हे शाखेने रिजवान यांना नोटीस बजावली होती.

रिझवान सिद्दीकी यांची चौकशी करुन त्यांना कोर्टात हजार केले जाईल, असे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले आहे. ठाणे पोलिसांनी माझा जवाब नोंदवला होता, मात्र माझा जवाब नोंदवला नसल्याचे सांगून 41A ची नोटीस न देता मला इथे आणल्याचे नवाजुद्दीन सिद्दीकीचे वकील रिझवान सिद्धीकी यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

अवैधरित्या कॉल्स रेकॉर्ड करून संभाषण लीक करण्यासंबंधात रिजवान सिद्दीकी यांना अटक केली आहे. नवाजुद्दीनच्या सांगण्यावरून कथित आरोपी गुप्तहेर प्रशांत पालेकर यांच्या माध्यमातून नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्धिकीचे फोन रेकॉर्ड काढले होते, असा आरोप रिझवानवर करण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.