नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येनंतर पंढरपूरमध्ये शुकशुकाट

0

अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची रविवारी (१८ मार्च) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पंढरपूरमध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान, आज (१९ मार्च) सकाळी पवार यांची अंत्ययात्रा शिवाजी चौकात रोखून नातेवाईकांनी ठिय्या मांडला. मारेकऱ्यांना त्वरित अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नवी मुंबईचे नगरसेवक विजय चौगुले यांनी घेतली होती.

तब्बल २० मिनिटे अंत्ययात्रा रस्त्यात रोखून धरल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचे आणि पवार कुटूंबाला पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर नातेवाईकांनी अंत्ययात्रा काढली. ११ वाजेच्या सुमारास संदीप पवार यांच्यावर सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान रविवारी घडलेल्या या घटनेनंतर पंढरपूर बंद झाले होते. सोमवारीही या घटनेची दहशत कायम दिसून आली. सोमवारी प्रमुख बाजार पेठेसह इतर परिसरात शुकशुकाट दिसत होता.

पंढरपूर येथे झालेल्या हल्ल्यानंतर संदीप पवार यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान संदीप पवार यांचा मृत्यू झाला. पंढरपुरातील गजबजलेल्या स्टेशनरोड परिसरात अपक्ष नगरसेवक संदिप पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हॉटेल श्रीराममध्ये त्यांच्यावर २ अज्ञातांनी गोळीबार करून कोयत्याने वार केले होते. गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या या हल्ल्यामुळे पंढरपूर शहर हादरून गेले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.