धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना मिळणार ५४ लाख रुपयांचा मोबदला

0

मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना ५४ लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी ऊर्जा विभागाला सादर केला असून त्यांच्या ५ एकर जमिनीसाठी ५४ लाख रुपये मोबदला देण्याची शिफारस या अहवालात केली आहे.मनरेगा कायद्यातील तरतुदीप्रमाणे धर्मा पाटील यांच्या नावे 28 लाख 5 हजार 984 रुपये तर त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांना 26 लाख 42 हजार 148 रुपयांचा मोबदला मान्य केला आहे. इतर 12 प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदला मिळणार असल्याची माहीत आहे.

80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा उपचारादरम्यान 28 जानेवारीला मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात वारंवार फेऱ्या मारत होते, मात्र त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते, त्यामुळे निराश होऊन त्यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केले होते. धुळे जिल्ह्यात उभ्या राहणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात धर्मा पाटील यांची ५ एकर जमीन संपादित केली होती. मात्र ५ एकर जमिनीच्या बदल्यात त्यांना फक्त ४ लाख रुपये भरपाई देण्यात आली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.