‘धर्माबाबा अमर रहे’च्या घोषणा, धर्मा पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

0

जमिनीच्या मोबदल्यासाठी सरकारच्या दाराच्या पायऱ्या झिजवणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या पार्थिवावर धुळे जिल्ह्याच्या विखरण गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार जयकुमार रावल यांनी धर्मा पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

धर्मा पाटील यांचे पार्थिव विखरण गावात उतरवताच गावकऱ्यांनी ‘धर्माबाबा अमर रहे, जय जवान जय किसान’ अशा घोषणा दिल्या. धर्मा पाटील यांचे पार्थिव पाहून कुटुंबीय आणि नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर विखरण गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 1 डीवायएसपी, 2 पीआय, 3 एपीआय, 12 पीएसआय, 120 कर्मचारी अंत्यविधीसाठी तैनात केले होते.

दरम्यान, धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच संतप्त झालेल्या विखरणवासीयांनी सोमवारी (२९ जानेवारी) रास्ता रोको केला होता.

८४ वर्षांचे धर्मा पाटील यांनी जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात विष प्राशान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र रविवारी (२८ जानेवारी) त्यांची प्राणज्योत मालावली.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांची 5 एकर जमीन औष्णिक प्रकल्पासाठी संपादित केली होती. मोबदल्यात आजपर्यंत चार लाख रुपये मिळाले. नुकसान भरपाईसाठी ते गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरठे झिजवत होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.