देशात सुरू होणाऱ्या 24 वैद्यकिय महाविद्यालयांपैकी एक औरंगाबादेत 

हेडगेवार रुग्णालयाचे असेल हे महाविद्यालय

0

औरंगाबाद : केंद्रीय अर्थ संकल्पात देशात नव्याने 24 वैद्यकिय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. त्यापैकी एक औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकिय प्रतिष्ठानच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाला मिळाले आहे.

साधारणतः 37 वर्षांपुर्वी औरंगाबादमध्ये हेडगेवार रुग्णालयाची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतील डॉक्टरांनी एकत्र येऊन हा प्रकल्प सुरू केला. माफक दरात वैद्यकिय सेवा देण्यावर त्यांचा भर होता. लोकवर्गणी आणि काही फार्मासुटीकल्स कंपन्यांनी दिलेल्या मदतीच्या आधारावर रुग्णालयाने आपला विस्तार केला. दलित वस्त्यांमधील शिक्षणाची आवड असणाऱ्या आणि वैद्यकिय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या अप्रशिक्षित मुलांना घेऊन ऑपरेशन, एक्स-रे, लॅब टेस्ट अशा रुग्ण सेवेसाठी वापरले. त्यात 1995 मध्ये युती चे सरकार आले. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मनावर घेऊन सिंचन खात्याची जमीन हेडगेवार रुग्णालयाला दिली.

रुग्णालयाचा विस्तार होतांना खासगी कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ राहील्यांनी व्यवस्थापनासाठी आले. ‘माणिकचंद’ गुटका तयार करणाऱ्या धरीवाल यांनी केलेल्या आर्थिक मदतीच्या आधारावर मजल्यावर मजले रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने उभारले. एकही तज्ज्ञ डॉक्टर नसतांना रुग्णालयात मुस्लिमांची गर्दी होते, त्यातच संघवाले खुश. या रुग्णालयाच्या कमाईवर नाशिकला रुग्णालय उभे केले. आता सरकारच्या ‘ओएनजीसी’शी टायप करुन असाममध्ये रुग्णालय सुरू केले आहे.

राम मंदिराच्या जागेवर कॉलेज :-

संघाचे स्नेहसंमेलन बीड बायपासच्या ज्या जमिनीवर झाले होते.तिथे हे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. ज्या किराडपुऱ्यातील राम मंदिराच्या ट्रस्टची 100 एकर जागा आहे. त्यापैकी 25 एकरात हे कॉलेज बांधणार आहेत. त्याची तयारी सुरू झाली आहे. निधी गोळा करण्यासाठी पुन्हा ‘माणिकचंद’ सारख्या दात्याच्या शोधात संघाचे सेवाव्रती आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.