दूध भेसळ करणाऱ्यांना ३ वर्षांची शिक्षा, कायदा लवकरच

0

दूध भेसळ करणाऱ्यांना ३ वर्षांची शिक्षा करणारा कायदा लवकरच राज्यात करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभेत दूध भेसळीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गिरीश बापट यांनी ही घोषणा केली. सध्या दुधात भेसळ करणाऱ्यांना ६ महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, ६ महिन्यांची शिक्षा असल्याने याप्रकरणात त्वरित जामीन होतो. ही शिक्षा ३ वर्षांपर्यंत वाढवली तर आरोपीला लगेच जामीन होणार नाही. त्यामुळे ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद असणारा कायदा लवकरच केला जाईल, असे बापट यांनी प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी अनेक आमदारांनी विधानसभेत केली. परंतु जन्मठेपेची शिक्षा करणारा कायदा आणण्यात अडचणी असल्याचे बापट यांनी सांगितले.

सध्या दूध भेसळीची तपासणी करण्यासाठी राज्यात ४ मोबाईल व्हॅन आहेत. मात्र, सातत्याने या व्हॅनद्वारे तपासणी व्हायला हवी, ती होत नसल्याची कबुली देताना संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत समज देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यापुढे तपासण्यांमध्ये अधिक सातत्य असेल अशी ग्वाही बापट यांनी विधानसभेत दिली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.