दिल्लीत शिवजयंतीच्या भव्य सोहळ्याला राष्ट्रपतींची उपस्थिती 

0

यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिल्लीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवजन्मोत्सव सोहळा, ढोलपथक, शाहिरी यांसह अनेक देखावे तसेच राजपथावरुन मिरवणूक असा सोहळा दिल्लीत पार पडत आहे. देशभरातून हजारो शिवप्रेमी नवी दिल्लीत दाखल झाले.

भाजप खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. दिल्लीतील शिवजयंती कार्यक्रमात हत्ती, घोडेही दिसले. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून लोक आले होते. शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन फुलांनी सजवले होते.

दिल्लीत होणाऱ्या मिरवणुकीसाठी महाराष्ट्रातील कलापथक, ढोलपथकाचे आयोजन केले आहे. तसेच जवळपास १०० कलाकार दिल्लीत आले आहेत. शोभायात्रेत पुण्याच्या ३०० कलाकारांचे ढोलपथक, २०० जणांची वारकरी दिंडी, २० जणांचे शाहिरी पथक, ८० कलाकारांचे मर्दानी खेळ पथक असा थाट आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.