दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या अफवा

0

प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना नानावटी रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आले होते. छातीत दुखत असल्याने त्यांना बुधवारी (२८ फेब्रुवारी) संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते असे म्हटले जात होते. मात्र एका वृतापात्राच्या रिपोर्टनुसार, राजकुमार संतोषी यांनी हे वृत्त खोट असल्याचे सांगितले आहे. संतोषी म्हणाले, ‘मी पूर्णतः बरा आहे. आजही तब्येत अगदी ठणठणीत आहे. मला कोणत्याही प्रकारचा हृदयाच्या संबंधित आजार नाहीये. मी नानावटी रुग्णालयात रूटीन चेकअपसाठी गेली होतो.’

राजकुमार संतोषी सध्या साराग्रहीच्या लढाईवर आधारित ‘बॅटल ऑफ साराग्रही’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. रणदीप हुडा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

राजकुमार संतोषी यांनी घायल (१९९०), दामिनी (१९९३), अंदाज अपना अपना (१९९४), घातक (१९९६), पुकार (२०००), लज्जा (२००१), दि लेजेंड ऑफ भगत सिंग (२००२), खाकी (२००४), अजब प्रेम की गजब कहानी (२००९) यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.