दिंडीतील अ‍ॅपे रिक्षाला ट्रकची धडक, 4 भाविकांचा मृत्यु

0

श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवाला निघालेल्या दिंडीतील अ‍ॅपे रिक्षाला एका ट्रकने धडक दिली. या अपघातात 4 भाविकांचा मृत्यु झाले, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्याजवळ सोमवारी (5 फेब्रुवारी) सायं. 4 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मृत वाशिम जिल्ह्यातील उमरा-कापसे येथील रहिवासी आहेत. काशीनाथ चंद्रभान कापसे, रमेश कापसे, लीला कापसे, रामजी काकडे अशी मृतांची नावे आहेत.

उमरा-कापसे येथील 170 भाविकांची दिंडी शेगाव येथे निघाली होती. दिंडीसोबत एक अ‍ॅपे रिक्षादेखील होती. त्यात 4 वारकरी बसलेले होते. दिंडी बाघ फाट्यावर विसाव्यासाठी थांबली, त्याचवेळी एक भरधाव ट्रक दिंडीत घुसल्याने अ‍ॅपेला धडक बसली. त्यामुळे चारही वारकरी रस्त्यावर कोसळले आणि नंतर हा ट्रक वारकऱ्यांच्या अंगावर जाऊन उलटला. ट्रकमधील मालाखाली दबल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला. तसेच विश्रांती घेत असलेले 6 भाविक यात जखमी झाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.