दागिने लुटून सराफा व्यापाऱ्याची कारखाली चिरडून हत्या 

0

कुंबेफळ येथून काम संपवून अंबाजोगाईला निघालेल्या सराफा व्यापारी विकास थोरात यांच्या अंगावर कार घालून त्यांच्याकडील सोन्याची बॅग चोरट्यांनी पळवली. या अपघातात सराफा व्यापारी जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी (१३ फेब्रुवारी) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. व्यापा-याला लुटून पळ काढताना एक चोरटा विहिरीत पडला. त्याला पोलिसांनी त्याचवेळी ताब्यात घेतले.  केज तालुक्यातील कुंबेफळमध्ये राहणाऱ्या विकास थोरात यांचे केज शहरातील कुंबेफळ येथे सराफा दुकान आहे. मंगळवारी रात्री ते दुकान बंद करुन सोने घेऊन घरी निघाले होते. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या ४ चोरट्यांनी कारमधून त्यांचा पाठलाग केला.

केज-अंबाजोगाई रस्त्यावरील एका जिनिंगसमोर थोरात आले तेव्हा डाव साधून चोरट्यांनी आपल्या कारने त्यांना धडक देऊन खाली पाडले. या धडकेत विकास थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील चोरट्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिची पिशवी घेऊन तिथून पळ काढला.

घटनास्थळी असलेल्या अमोल थोरात यांनी कारचा नंबर त्यांच्या मित्रांना फोन करुन सांगितला. फोनवरील माहितीनुसार कारवर लक्ष ठेवण्यासाठी त्या परिसरात थांबलेल्या तरुणांना एक बंद पडलेली कार दिसली. त्यांनी कारजवळ जाऊन चौकशी केली. त्यांना कारच्या डाव्या बाजूला धडक दिल्याचे काही निशाण दिसले. विकास थोरात यांना धडक दिलेली कार हीच असल्याची त्यांना खात्री पटली. त्यांनी ‘सोन्याची पिशवी कुठे आहे?’ असा प्रश्न विचारून कारची झडती घेतली. कारमध्ये दागिन्यांची पिशवी आढळून आली.

बघ्यांची गर्दी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर कारमधील तिघांनी तिथून पळ काढला. त्यातील एक जण पळून जाताना विहिरीत पडला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विहिरीत पडलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळातच परिसरातील लपून बसलेला आणखी एक चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.