दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा लवकरच राजकीय प्रवेश

0

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक टॉलिवूड अभिनेता राजकारणात पाऊल टाकत आहे. हा इतर कुणी नसून सुपरस्टार रजनीकांत आहेत. रजनीकांत येत्या ३१ डिसेंबरला राजकारणात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. राजकीय प्रवेशाबाबत स्वःत रजनीकांत म्हणाले, थोडा उशीरच झाला, पण माझा राजकीय प्रवेशच मोठा विजय असेल. राजकारण हे क्षेत्र माझ्यासाठी नवे नाही, असे सांगुन येत्या ३१ डिसेंबरला राजकारणात नव्याने प्रवेश करत असल्याचे ते म्हणाले.

अभिनेता रजनीकांत यांनी चेन्नईत आजपासून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. चेन्नई येथील राघवेंद्र कल्याण मंडपमध्ये १८ जिल्ह्यांतून हजारो चाहते त्यांच्या भेटीला आले आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हसन यांनी राजकीय एन्ट्री केल्यानंतर रजनीकांत राजकारणात कधी येणार, याची उत्सुकता होती. आता या उत्सुकतेला पूर्णविराम लागला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.