दहावीच्या विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या

0

पिंपरी चिंचवडमध्ये १० वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निगडी परिसरातील पूर्णानगर भागात सोमवारी (१२ मार्च) मध्यरात्री ही घटना घडली. वेदांत भोसले असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

वेदांत हा निगडीतील माता अमृता शाळेत दहावीत शिकत होता. वेदांत आणि त्याची मैत्रीण रात्री १२ पर्यंत अभ्यास करत होते. अभ्यास केल्यानंतर वेदांत मैत्रिणीला रात्री सोडवण्यासाठी गेला. तेव्हा घरी परत येत असताना त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. वेदांतवर हल्ला का करण्यात आला आणि हल्लेखोर कोण होते याबाबत अजून स्पष्ट झाले नाहीये. निगडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.