दहशतवाद्यांचा सीआरपीएफ कॅम्पमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, एक CRPF जवान शहीद 

0

आज (12 फेब्रुवारी) पहाटे 4.30 वाजता अंधाराचा फायदा घेत एके-47 असलेल्या दोन दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या कॅम्पला लक्ष्य केले. 2 दिवसांपूर्वी झालेल्या लष्करी तळावरील हल्ला ताजा असतानाच आज (12 फेब्रुवारी) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये घुसखोरी करून हल्ला केला. मात्र नेहमी सतर्क राहणाऱ्या सुरक्षादलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.

तिथून पळ काढून हे दहशतवादी जवळच्याच इमारतीत घुसले आणि तिथून गोळीबार सुरु केला. त्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. सुरक्षादलाच्या जवानांनी या संपूर्ण इमारतीलाच घेरले आहे. या दरम्यान, गेल्या 7 ते 8 तासांपासून दोन्ही बाजूने सतत गोळीबार सुरु आहे. या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सैनिकांचे प्रयत्न सुरु आहेत.

लष्करावर हल्ल्याची दुसरी घटना –
गेल्या 2 दिवसांत लष्करावर हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 10 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जम्मू-पठाणकोट हायवेवरील सुंजावाँ लष्करी तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 5 भारतीय जवान शहीद झाले होते. तर यावेळी 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.