तुळजापूरला जागरण-गोंधळ घालून सरकारचा निषेध, राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन सुरू

0

उस्मानाबादमधील तुळजापूरच्या भवानीमातेच्या मंदिरासमोर जागरण गोंधळ घालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन वर्षात सरकारने राज्याचे वाटोळे केल्याचे सांगत हे सरकार दूर व्हावे, असे साकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुळजाभवानी मातेला घातले आहे.

तुळजाभवानीचे पारंपरिक गोंधळी राजाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली पारंपरिक वेशभूषेत जागरण-गोंधळ घालण्यात आला. गोंधळातून सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध केला.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आदी नेते उपस्थित असून राष्ट्रवादीचे अनेक नेते तुळजापुरात आले आहेत.

जागरण गोंधळ घालून या आंदोलनास सुरुवात झाली. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन देखील देण्यात आले. या मोर्चात दिलीप वळसे पाटील यांच्यासह महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, पद्मसिंह पाटील, राणा जगजीत सिंग, अमरसिंह पंडित, विक्रम काळे, सतीश चव्हाण, दीपक आबा साळुंके, विद्या चव्हाण, बसवराज पाटील नागराळकर, संदीप बाजोरिया, संगीता ठाकरे, नरेंद्र बोरगावकर, सोनाली देशमुख,रामराव वडकुते, संग्राम कोते आदींची उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.