तुकाराम मुंढेंचा पहिल्याच दिवशी दणका, गणवेश परिधान न केलेल्या अधिकाऱ्याला बैठकीतून काढले बाहेर

0

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्का देत आज (9 फेब्रुवारी) महापालिकेत एक बैठक बोलावली. या बैठकीत गणवेश परिधान करुन न आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला त्यांनी बैठकीतून थेट बाहेर काढले.

तुकाराम मुंढे यांनी बोलवलेल्या महापालिकेतील बैठकीला अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजन हे आधीच उशिरा पोहचले होते. ते गणवेश परिधान न करुन आल्याने त्यांना गणवेश घालून येण्याच्या सूचना देत बैठकीतून बाहेर काढले. त्यानंतर अनिल महाजन हे 15 मिनिटांत गणवेश परिधान करुन पुन्हा बैठकीला हजर झाले. तुकाराम मुंढे आपल्या शिस्तबद्ध कार्यासाठी ओळखले जातात. याचा प्रत्यय नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्यांना पहिल्याच दिवशी आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या कारभार व्यवस्थित चालवा. रखडलेली कामे पूर्ण व्हावीत, यासाठी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान, शेकडो कोटींच्या रस्ते डांबरीकरणाचा विषय, शहरातील इमारतीच्या कपाटाचा प्रश्न, एलईडी बसवण्याचा वादग्रस्त प्रस्ताव यांसारखे अनेक रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान मुंढे यांच्यासमोर आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.