तिघांना गोळ्या झाडणाऱ्या एसआरपीएफचा जवान संजय शिंदेला अटक

0

दौंडमध्ये अंदाधुंद गोळीबार करुन तिघांचा बळी घेणाऱ्या एसआरपीएफचा जवान असलेल्या संजय शिंदेला अटक करण्यात आली आहे. अहमदनगरच्या सुपामधून संजय शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

संजय शिंदेने सुरुवातीला दौडंच्या नगर मोरी चौकात दोघांवर गोळीबार केला आणि त्यानंतर बोरावकेनगर इथे एकावर गोळी झाडली. संजय हा जुगार खेळून आर्थिक व्यवहार करत असत. याच वादातून गोळीबार केल्याचे समोर आले आहे.

गोळीबारात अमोल जाधव, गोपाळ शिंदे आणि प्रशांत पवार यांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला संजय दौंडमधील घरातच लपल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याच्या घराला वेढा घातला होता. मात्र तो त्याआधीच तिथून फरार झाला होता. त्यानंतर त्याचा मोबाइल फोन ट्रॅक करुन त्याला अहमदनगरमधून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील पिस्टल, दुचाकी जप्त करण्यात आली.

आरोपी संजय शिंदे हा राज्य राखीव दलाच्या कोल्हापूर विभागातील ग्रुप १६ बटालियनचा जवान आहे. त्याला दौंड येथील शस्त्रागार विभागात नियुक्ती देण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून गोपाळ शिंदे, प्रशांत पवार व अनिल जाधव यांच्याशी त्याचे पैशाचे व्यवहार झाले होते. याच कारणावरून त्यांच्यात वादविवादही सुरू होता. मंगळवारी दुपारी आरोपी संजय शिंदे आपल्या शासकीय पिस्टलसह नगरमोरी येथील चौकात या तिघांचा शोध घेत आला होता. गोपाळ शिंदे व प्रशांत पवार हे त्याला दुचाकीवरून जाताना दिसले. त्याने या दोघांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. नंतर १० मिनिटाच्या अंतराने आरोपी संजयने अनिल जाधवच्या घरात जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात अनिलचाही जागीच मृत्यू झाला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.