तर हिंदूच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील – प्रकाश आंबेडकर

0

भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर वादग्रस्त विधान करून चर्चेला उधाण आणले आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा दिली नाही तर तर हिंदूच्या घरात हाफिज सईद जन्माला येतील, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

भाजपाविरोधात विरोधकांकडून ‘लाठी रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रकाश आंबेडकरांनाही बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. या सभेत माजी खासदार शरद यादवही सहभागी झाले होते.

भोपाळ येथे महात्मा फुले परिषदेतर्फे माजी खासदार सुखलाल कुशवाह यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त भाजपाविरोधात लाठी रॅली आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना आंबेडकरांनी आरोप केला की, ‘महाराष्ट्र सरकार दोषींवर कारवाई करण्याऐवजी पीडित व्यक्तींनाच त्रास देत आहे. हे सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांगण्यावरून सुरू आहे असाही आरोप त्यांनी केला. जर सरकारने दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील, असे विधान केले. मागास समजल्या जाणाऱ्या जातीच्या बांधवांनी सरकारविरोधात एकत्र यायला हवे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

समाजवादी नेते शरद यादव यांनी देशातील मागासवर्गीय, दलित बांधव आणि आदिवासींनी सरकारविरोधात एकत्र आले पाहिजे, असे आवाहन केले. जर सरकारनेच या प्रकरणातील दोषींना मदत करायला सुरुवात केली तर मग त्यांच्यावर अंकुश ठेवणार तरी कोण? असे मत यादव यांनी व्यक्त केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.