…तर मी भाजपमध्ये यायला तयार; बच्चू कडू यांचे खळबळजनक वक्तव्य

सरकारने 50 टक्के नफा धरून शेतीमालास हमीभाव आणि त्याच भावात खरेदीची हमीची मागणी

0

अहमदनगर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले तर मी भाजपमध्ये जाण्यास तयार आहे, असा खळबळजनक दावा जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.

अहमदनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बच्चू कडू यावेळी म्हणाले की, शेतकऱ्यांना 50% नफा धरून हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतमाल खरेदीची हमी सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने कृषी कायद्यांमध्ये या दोन सुधारणा केल्यास मी भाजपमध्ये जाऊन त्यांची सेवा करेन. दरम्यान यावेळी बिहार निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हवं तेवढं यश मिळालं नाही. निवडणुकीत कमी-जास्त सुरु राहतं, मात्र भाजपला मोठं यश मिळालेले नाही.

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. हा कायदा लागू केल्यापासून काँग्रेससह मित्रपक्ष सातत्याने त्याचा विरोध करत आहेत. राज्यातही काँग्रेसने कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून काँग्रेसची राज्यभरात आंदोलने सुरु आहेत. महाराष्ट्र सरकारने कृषी कायद्याविरोधात भूमिका घेतलेली नाही अथवा त्यास पाठिंबादेखील दर्शवलेला नाही.महाराष्ट्र काँग्रेसने गेल्या आठवड्यात कोल्हापूर आणि जळगावात कृषी कायद्याला विरोध करत ट्रॅक्टर रॅली काढल्या. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नियोजनात काँग्रेसने कोल्हापुरात ट्रॅक्टर रॅली काढली होती. या ट्रॅक्टर रॅलीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.