डेव्हिड वॉर्नरची सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून पायउतार

0

बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबाद कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. अशी माहिती सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सीईओंनी दिली आहे. लवकरच नवीन कर्णधाराची घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले. मागील वर्षी सनरायझर्स हैदराबादच्या टीममध्ये वॉर्नरने दमदार फलंदाजी केली होती.

राजस्थान रॉयल्सनेही स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. त्याऐवजी अजिंक्य राहणेकडे कर्णधारपद सोपवले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने चेंडू अनाधिकृतपणे कुरतडल्याच्या प्रकरणानंतर सर्व स्थळातून याबाबत गंभीर दखल घेण्यात आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची कर्णधार आणि उपकर्णधार पदावरून हकापट्टी केली आहे. या दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला परत जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.