डीएस कुलकर्णी यांच्या बंगल्याचा बँकेकडून होणार लिलाव

0

बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी डीएस कुलकर्णी पोलिसांच्या ताब्यात आहेत. कर्जाची परतफेड न केल्याने डीएसके यांच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून 8 मार्चला लिलाव केला जाणार आहे. डीएसके यांचा पुण्यातील सेनापती बापट मार्गावर आलिशान बंगला आहे.

या बंगल्याची बेस प्राईस 66 कोटी 39 लाख रुपये ठेवली आहे. बँकेकडून या लिलावाची पेपरला जाहिरात दिली आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी टेकडी जवळ त्यांचा हा बंगला आहे. गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी डीएसकेंवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर त्यांना दिल्लीतून अटक केली होती. पोलीस कोठडीत येताच त्यांचा पाय घसरला आणि ते खाली कोसळले. सध्या त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.