ट्रॅक्टर-क्रूझरच्या अपघातात 6 पैलवानांचा मृत्यू, 6 पैलवान गंभीर जखमी

0

खडेगाव-वांगी येथे ट्रॅक्टर-क्रूझरच्या अपघातात ६ पैलवानांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच ६ पैलवान गंभीर जखमी आहेत. सांगली क़डेगावातील वांगी येथे हा अपघात घडला असून जखमींवर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी (१२ जानेवारी) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास वांगी येथील शिरगाव फाट्यावर हा भीषण अपघात घडला. क्रांती तालीम मंडळ, कुंडल (ता. पलुस) येथील १३ पैलवान शुक्रवार दि. १२ रोजी औंध (जि. सातारा ) येथील कुस्ती मैदानासाठी गेले होते. कुंडलकडून वांगी गावाच्या दिशेने येणा-या ऊस वाहतुक करणा-या ट्रॅक्टरने क्रूझरला धडक दिली. ट्रॅक्टरचालक दिनकर पवारचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात क्रूझर चेंदामेंदा झाली असून मध्यरात्री तात्काळ उपचाराची सोय न झाल्याने ६ पैलवानांचा मृत्यू झाल्याचे एका जखमी पैलवानाने सांगितले.

यामध्ये विजय शिंदे, आकाश देसाई, शुभम घारगे, सौरभ माने, अविनाश गायकवाड, रणजीत धनवडे हे ६ जण जागीच ठार झाले. तर अजय कासुर्डे, अनिकेत जाधव, अनिकेत गावडे, रितेश चोपडे, अनिल पाटील, प्रतीक निकम, तुषार निकम हे सात जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने मिरज येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ट्रॅक्टरचालक दिनकर पवार हा घटनास्थळापासून फरार झाला आहे. चिंचणी वांगी पोलीस अधिक तपास करत आहेत .

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.