टीडीपी अखेर एनडीएमधून बाहेर; भाजपला बसला आणखी एक धक्का

0

आंध्रप्रदेशला विशेष दर्जा मिळाला नसल्याने नाराज असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (टीडीपी) यांनी भारतीय जनता पार्टीपासून (एनडीए) वेगळे होण्याचे ठरवले आहे. याबाबतची माहिती चंद्राबाबू नायडू यांनी खासदारांना दिली असल्याचे कळते आहे. याबाबतची पक्षाकडून लवकरच औपचारिक घोषणा केली जाणार आहे.

दोन महिन्यांनी होणाऱ्या कर्नाटक निवडणूकांच्या तोंडावरच चंद्राबाबू नायडू यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भाजपला धोका निर्माण झाला आहे. एकीकडे उत्तर प्रदेशातला पराभव आणि दुसरीकडे शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा निर्णय या दोन्ही धक्यातून सावरत असतानाच भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आज वायएसआर काँग्रेस संसदेत नरेंद्र मोदी सरकारविरूद्ध अविश्वास प्रस्ताव मांडणार आहेत, अविश्वास प्रस्तावाला टीडीपीही पाठिंबा देणार असल्याची घोषणा चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.