‘टायगर जिंदा है’ने जमवला कोटींचा गल्ला, सर्व विक्रम काढले मोडीत
सलमान खान आणि कतरिना कैफच्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपट यावर्षातील बॉक्स ऑफिसवरचे कमाईचे सर्व विक्रम मोडित काढण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाची विक्रमी कमाई सुरुच आहे. एका आठवड्यात 115 कोटींची कमाई केल्यानंतर चित्रपटाने सोमवारी देखील आचर्यचकित करणारी कमाई केली आहे. चित्रपटाने चार दिवसात तब्बल 151.47 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
यंदाचा विकेंड ओपनर ‘गोलमाल अगेन’ चित्रपटचा विक्रम ‘टायगर जिंदा है’ ने मोडला. ख्रिसमसच्या मुहूर्तावर चित्रपटाने 39.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा बॉलिवूड चित्रपटाच्या सोमवारच्या कमाईचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.
फोर्ब्सने चार दिवसांत 154 कोटी रुपयांच्या कमाईचा अंदाज लावला होता. मात्र ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाने शुक्रवारी 34.10 कोटी, शनिवारी 35.30 कोटी, रविवारी 45.53 कोटी आणि मंगळवारी 36.54 कोटी अशाप्रकारे एकूण 151.47 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.