‘टायगर जिंदा है’च्या वाढू शकतात अडचणी, राज ठाकरे यांनी दिली धमकी
ऐ दिल है मुश्कीलनंतर आता राज ठाकरे यांनी टायगर जिंदा है चित्रपटावर निशाणा साधला आहे. सलमान खानचा टायगर जिंदा है चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या हिंदी चित्रपटामुळे मराठी चित्रपटाला थियटर मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी थियटरच्या मालकांना पत्र देऊन धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. या पत्रात त्यांनी म्हंटले आहे, कि जर देवा चित्रपट प्राइम टाइममध्ये दाखवला नाही तर आम्ही सलमान खानचा टायगर जिंदा है प्रदर्शित होऊ देणार नाही. जर महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना थियटरमध्ये प्राधान्य दिले नाहीतर हे भविष्यात मराठी चित्रपटांसाठी अडचणीचे ठरेल. त्यामुळे मराठी चित्रपटांना थियटरमध्ये स्थान देणे आवश्यक आहे. असे झाले नाही तर आम्ही कोणतेच हिंदी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. अंकुश चौधरीचा देवा हा मराठी चित्रपट सलमान खानच्या टायगर जिंदा है सोबत प्रदर्शित होत आहे.